गणेशोत्सव मंडळ
आदर्श नगराचा राजा — कोल्हेवाडीची शान
संगमनेर तालुक्यात कोल्हेवाडी गाव, आदर्श नगरच्या राजाचं गाजतं नाव, गणरायाच्या स्वागताची तयारी भारी, एकजुटीने सजली मंडळी सारी!
उत्सव वैशिष्ट्ये
- 1सहभागकोणी अध्यक्ष, कोणी सदस्य नाही, इथे प्रत्येकाची जबाबदारी सारखी, खांद्याला खांदा लावून सारे, गणरायाची सेवा करतात मनापासून भारी!
- 2ढोल ताशांचा नादढोल ताशांचा नाद घुमतो, मोरयाचा जयघोष दुमदुमतो, आदर्श नगर तरुण मित्र मंडळ, एकजुटीने उत्सव गाजवतो!
- 3एकतासगळे अध्यक्ष, सगळे सदस्य, हीच मंडळाची ओळख खास, एकमेकांच्या साथीने येथे, वाढतो प्रत्येकाचा विश्वास!
कोल्हेवाडी गावचं टॉपचं मंडळ, नाव आदर्श नगर तरुण मित्र मंडळ, भक्ती, मैत्री आणि एकजुटीने, गाजवतात गणपतीचा सोहळा मंगल!